सोनं आज पुन्हा स्वस्त
Gold Silver Price Today:सोने आणि चांदीच्या बाजारात आज संमिश्र कल दिसून येत आहे. वायदा बाजारात सोन्या-चांदीत उसळी घेऊन व्यवहार होत असताना, आज स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव घसरणीसह व्यवहार करत आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात जात असाल, तर दिल्ली-मुंबईत स्वस्तात सोने उपलब्ध होत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याचा दर
आज 176 रुपयांच्या वाढीसह एमसीएक्सवर सोने मिळत आहे. सोने 176 रुपये किंवा 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 50,371 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले जात आहे. ही सोन्याची किंमत ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहे. याशिवाय चांदीच्या दरावर नजर टाकली तर त्यात 500 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. चांदीचा दर आज 553 रुपये किंवा 0.93 टक्क्यांनी वाढून 60054 रुपये प्रति किलोवर आहे. या चांदीच्या किमती जुलैच्या फ्युचर्ससाठी आहेत.
दिल्लीत आज सोन्याचा दर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सोन्याचा दर 230 रुपयांनी घसरला आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 230 रुपयांनी घसरून 47170 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 270 रुपयांनी घसरून 51,440 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे.
मुंबईत सोन्याचा
दर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांनी घसरून 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 270 रुपयांनी घसरून 51,440 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे.