शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (07:48 IST)

हीरोची हार्ले डेविडसनसोबत हातमिळवणी

हार्ले डेविडसन (Harley Davidson) आणि हीरो मोटोकॉर्पने मंगळवारी संयुक्तपणे म्हटले की, वितरण करारानुसार हीरो मोटोकॉर्प हार्ले-डेविडसनची बाईक विक्री करेल. हा ब्रांड-विशिष्ट हार्ले-डेविडसनचे डिलर्स नेटवर्क आणि हीरोच्या डिलर नेटवर्कच्या माध्यमातून एक्सेसरीज आणि इतर वस्तू देखील विक्री करेल. निवेदनात म्हटले आहे की, परवाना कराराअंतर्गत हीरो मोटोकॉर्प हार्ले-डेव्हिडसन या ब्रँड नावाने प्रीमियम मोटारसायकली विकसित आणि विक्री करेल.

हार्ले-डेव्हिडसन हा लोकप्रिय ब्रँड आणि हीरो मोटोकॉर्पचं मजबूत वितरण नेटवर्क हे ग्राहक सेवा घेऊन येणार आहे.यावर्षी सप्टेंबरमध्ये हार्ले-डेव्हिडसनने भारतातील उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. सुमारे दशकांपूर्वी कंपनीने भारतात प्रीमियम मोटारसायकली विक्रीला सुरुवात केली होती.