गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (08:57 IST)

जेट एअरवेजची खास ऑफर

मुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोबतच विमानसेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता जेट एअरवेजने खास सूट जाहीर केली आहे. जेट एअरवेजने प्रवाशांसाठी खास वेवर ऑफर जाहीर केली आहे. जेट एअरवेजने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 9 जुलैला मुंबईला प्रवास करणारे फ्लाईट बदलू शकतात. फ्लाईट बदलण्यासाठी त्यांना कोणतीही पेनाल्टी लागणार नाही. दोन विमानांच्या दरांमध्ये जरी फरक असला तरीही तो आकारला जाणार नाही. प्रवाशांना सोयीनुसार दुसरे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. केवळ वेळेमध्येच नव्हे तर तारखेमध्येही बदल करून दिला जाणार आहे.