रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 जून 2018 (13:00 IST)

मल्ल्या यांचा आरोप : मला कर्जबुडव्यांचा 'पोस्टर बॉय' बनवले

राष्ट्रीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्लायाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांच्या कर्जाची परतफेडकरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण मला कर्ज बुडवणार्‍यांचा 'पोस्टर बॉय' बनवून टाकले आहे, असा आरोप मल्ल्याने केला आहे. आता हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्यास मी काही करू शकत नाही, असेही तो म्हणाला.
 
ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्याने एक पत्रक प्रसिद्ध करून बाजू मांडली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना 15 एप्रिल 2016 रोजी एक पत्र पाठवून आपली बाजू मांडली होती. मात्र, दोघांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ते पत्र सार्वजनिक करणार आहे, असे मल्ल्याने म्हटले आहे.
 
बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे मी प्रयत्न केले. पण मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवून टाकले. माझे नाव घेताच लोक भडकतात. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित होऊन केले असल्यास त्याला मी काहीही करू शकत नाही, असे मल्ल्या म्हणाला.