मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (15:20 IST)

1 एप्रिलपासून औषधे महागणार, जाणून घ्या किती वाढणार किंमत

Abortion medicine
आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. 1 एप्रिलपासून औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. 2022 मध्ये सरकारने अधिसूचित केलेल्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकातील वार्षिक बदलाच्या आधारावर औषधांच्या किमती 12 टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात.1 एप्रिलपासून पेनकिलरपासून अँटिबायोटिक्ससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत

सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना औषधांच्या किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. 
पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह सुमारे 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात.
 
 
Edited By- Priya Dixit