Mumbai-Pune Expressway चा टोल महागणार
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा टोल महाग होणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.
1 एप्रिलपासून कारसाठी 270 रुपये मोजावे लागतील. जाणून घ्या नवे दर-
कार- 270 रुपये
मिनीबस- 420 रुपये
बस- 797 रुपये
ट्रक टू अॅक्सल- 580 रुपये
अवजड वाहने- 1835 रुपये
कारसाठी सध्याचा टोल आहे 230 रुपये. मिनीबससाठी सध्या 355 रुपये टोल आकारला जातो. बससाठी सध्या 675 रुपये टोल आकारला जातो. ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या 493 रुपये टोल आकारला जातो. क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या 1555 रुपये टोल आकारला जातो.
पुढील 15 वर्षांसाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. MSRDC ने नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आधीच काढलेल्या अधिसूचनेप्रमाणे दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात 18 टक्के वाढ होईल.