रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कांदा निर्यातीसाठीचे अनुदान दुप्पट

केंद्र सरकारने कांदा  निर्यातीसाठीचे अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीसाठी पाच टक्के अनुदान दिले जायचे. ते आता १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकार करू शकते. काही दिवसांपूर्वीच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुरुवारी सरकारने अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार एक क्विंटल कांद्यामागे शेतकऱ्यांना २०० रुपये मिळतील. यासाठी सरकारने १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव सातत्याने पडत असल्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. उत्पादन खर्च प्रति क्विंटल १००० रुपये असताना बाजारात कांदा कवडीमोलाने विकला जात आहे.