भारतातल्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांपैकी ‘टाटा मोटर्स’मधल्या अधिकाऱ्यांची सर्व पदं रद्द करण्यात आली आहेत.त्यामुळे आता याठिकाणी कोणीही बॉस नाही कोणीही वरिष्ठ पदावर राहणार नाही. त्यामुळे एक नवीन पायंडा टाटा ने तयार केला आहे. सर्व स्थरातून याचे स्वागत केले जात आहे.संघ काम अर्थात टीम वर्कला महत्व आहे असे टाटाने सांगितले आहे. नवीन निर्णयानुसार आता याठिकाणी कुठल्याही विभागात मॅनेजर वगैरे पद नसणार आहे.तर फक्त टीम हेडची नियुक्ती असेल. या ऐतिहासिक निर्णयाने आता जनरल मॅनेजर, सिनियर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, व्हॉईस प्रेसिडंट, सिनियर व्हॉईस प्रेसिडंट यांसारखे महत्त्वाची पदं रद्द करण्यात येणार आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीम लीडर यांसारखे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असलेली पदं कायम ठेवली जाणार आहेत. हा निर्णय लागू तर झाला आहे.मात्र येत्या काही दिवसांत याचे परिणाम सुद्धा दिसून येतील.