उज्जवला योजना : मोदी सरकारची महिलांना भेट, आता मिळणार 600 रुपयांना गॅस सिलिंडर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठीचे अनुदान 300 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति एलपीजी सिलिंडरपर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षी ऑगस्टमध्ये प्रति घरगुती एलपीजी सिलेंडर 200 रुपये अनुदान मंजूर केले होते आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्याच्या सबसिडीत
200 रुपयांची वाढ केली होती.
केंद्र सरकारने गेल्या 37 दिवसांत दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्याचा लाभ 10 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारने वाढवलेले हे अनुदान आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे.
उज्ज्वला लाभार्थ्यांना 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी प्रति सिलिंडर 703 रुपये मोजावे लागतात, तर बाजारभाव 903 रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता त्यांना फक्त 603३ रुपये मोजावे लागणार आहेत.
Edited by - Priya Dixit