रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2017 (16:16 IST)

विजय माल्याला लंडनमध्ये अटक

लंडन- भारताचा फरार उद्योगपती विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ट पोलिसाने त्याला अटक केली आहे. या हालचालीमुळे माल्याला भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल असा अंदाज आहे. 
 
परराष्ट्र मंत्रालयाने 9 फ्रेबुवारी रोजी विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे, अशी माहिती देण्यात आली होती.
 
उल्लेखनीय आहे की विजय माल्याने देशातील विविध बॅंकाना जवळपास 9000 कोटींचा गंडा लावून परदेशात पलायन केले होते. माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.