रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (09:48 IST)

बिग बॉस मराठी २ ची तारीख पुढे ढकलली

बिग बॉस मराठीसाठी आणखीन काही दिवस वाट बघावी लागणार आहे. या सीझनची तारीख पुढे ढकलून २१ एप्रिल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीमुळे बिग बॉस मराठी २ ची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
 
याआधी बिग बॉस मराठी २ ,१९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. सिझनच्या स्पर्धकांना आणि पहिल्या सिझनमधील स्पर्धकांनाही माहिती देण्यात आली होते. त्यासाठी याचे चित्रीकरण १७ आणि १८ मे ला होणार होते. पण आता बिग बॉस मराठी २६मे ला सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचे चित्रीकरण २४  आणि २५ मे ला होईल. लोकसभेचा निकाल २३ मे ला जाहीर होणार असल्याने बिग बॉस मराठीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २३ तारखेला निकाल असल्यामुळे कोणाची सत्ता येणार हे बघण्यात प्रेक्षकांना जास्त रस आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम होऊ नये यासाठी हा सीझन पुढे ढकलण्यात आला आहे.