रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (19:31 IST)

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी' 8 मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत

kanni
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने 'कन्नी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर निर्माते अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी आहेत. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा ए ए फिल्म्स यांनी सांभाळली आहे. पोस्टरवरून हा चित्रपट खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. मैत्री आणि प्रेमाला जोडणारी ही 'कन्नी' नात्यांची एक नवीन गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना समीर जोशी म्हणतात की, ज्याप्रमाणे बेभान उडणारा पतंग हवेत त्याचा तोल मजबूत कन्नीमुळे सांभाळू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा पतंग देखील मैत्री, प्रेम यांची मजबूत कन्नी असली की अगदी चंद्राशेजारीसुद्धा पोहोचू शकतो! याच प्रेम आणि मैत्रीच्या ‘कन्नी’ची तरूण, ताजी, मस्तीखोर आणि तितकीच आपलीशी वाटेल अशी गोष्ट म्हणजे ‘कन्नी’ हा चित्रपट.