सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (11:57 IST)

'किचन कल्लाकार ' संकर्षण कऱ्हाडेंचा नवीन कुकरी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फोटो साभार - इंस्टाग्राम 
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे खास खवय्यांसाठी झी मराठी वाहिनीवर मराठी कुकिंग शो 'किचन कल्लाकार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे .या शो मध्ये संकर्षण सूत्र संचालन करणार असून या शो चा टिझर नुकताच वाहिनीवर सादर झाला आहे . या टिझर मध्ये संकर्षण म्हणत आहे की भल्या-भल्या लोकांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार .या शो मध्ये पदड्यावरील कलाकार भाग घेणार असे समजत आहे. हा कुकिंग शो काय धमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.