गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (09:31 IST)

अनिकेतला लागलेत लग्नाचे वेध

'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात अनिकेत विश्वासराव लग्नसाठी उतावळा असलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अनिकेत आणि भाग्यश्री मोटे हे दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहेत. अनिकेतला सिनेमात लग्न करण्याची खूप घाई असते या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत.