शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (16:19 IST)

VED : रितेश जेनिलियाचा नवा सिनेमा

ved marathi movie
अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ' वेड ' च्या पोस्टर चे अनावरण केले.
 
20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे  या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत . या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री  जिया शंकर  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर केली.
Edited by : Smita Joshi