शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (13:08 IST)

Shanta Tambe passed away : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे वयाच्या 90 वर्षी निधन

social media
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज सोमवारी वयाच्या 90 वर्षी कोल्हापुरात निधन झाले. त्या नाटकात काम करून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.देशबंधू संगीत मंडळींच्या नाटकात त्यांनी अभिनय केले होते.  त्यांनी मोहित्यांची मंजुळा, मोलकरीण, मर्दानी, सवाल माझा ऐका, बाई मोठी भाग्याची, दोन बायका फजिती ऐका, सोंगाड्या, असला नवरा नको गं बाई,  या चित्रपटात काम केले. चांडाळ चौकडी आणि चंदनाची चोळी या चित्रपटात काम केले आहे. 
 
आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत शांताताईंनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर पाटील अशा नामवंत दिगदर्शकां सोबत काम केले. त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकावे लागले. असे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit