सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (12:37 IST)

Subhedar review:सुभेदार चित्रपटाचा रिव्ह्यू

दिगपाल लांजेकर यांच्या शिव अष्टक पुष्प मधील पाचवे पुष्प असलेला चित्रपट सुभेदार हा इतिहासातील महत्त्वाची घटना सांगतो. सुभेदार चित्रपट ए .ए . फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट द्वारा प्रदर्शित होत असून प्रद्योत प्रशांत पेंढरकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड, दिगपाल लांजेकर, आणि अनिल नारायण वरखडे या चित्रपटाचे निर्माते आहे. 

या चित्रपटामध्ये शूरवीर नायकाची कथा आहे ज्याने आपल्या मुलाच्या लग्नाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढा आणि विजय मिळवण्याचा विचार केला. आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. हे तानाजी होते ज्यांचा सरदार ते सुभेदार तानाजी  बनण्याचा प्रवास दाखवला आहे. आधी लगीन कोंडाण्याचा नंतर रायबाचं असं म्हणत उदयभानाला संपवून कोंडाण्या किल्ला काबीज केला. हे या चित्रपटात दिसले आहे .

सुरुवातीला या चित्रपटात मूळ गोष्ट रंजक आहे. मध्यंतराआधी सिनेमाचा वेग संथ असून मध्यंतरानंतर सिनेमा वेगात आहे. चित्रपटाची गाणी विशेष प्रभाव पाडत नाहीं. हा चित्रपट पाहताना तानाजी या हिंदी चित्रपटाची आठवण करुन देतो. अभिनयात सर्व कलाकार प्रभाव पाडतात. चिन्मय मांडलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर मृणाल कुलकर्णी या आऊसाहेबांच्या भूमिकेत आहे. अजय पुरकरांनी तानाजी मालसुरे यांची भूमिका चोख बजावली आहे. ऐतिहासिक चित्रपट बघण्याची आवड असल्यास हा चित्रपट नक्की बघा. 
 
Edited by - Priya Dixit