बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

‘लाल बत्ती’ चा उत्कंठावर्धक टीझर

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. समाजमाध्यमांमध्ये हा टीझरविषयी व्हायरल होत असून याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे. ‘लाल बत्ती’ हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार असून चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी हे कालाकार या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
 
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमविषयी (QRT) या टीझर मधून सांगण्यात आले आहे. ‘QRT’ टीमला देण्यात येणारे खडतर प्रशिक्षण यात दाखवण्यात आले आहे. जिगरबाज पोलिसांची कहाणी उलगडणारा ‘लाल बत्ती’ चित्रपट लढण्याची प्रेरणा देणार आहे.