शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (10:35 IST)

Asian Games 2023 IND vs BAN भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये

IND vs BAN भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 96 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून टिळक वर्माने नाबाद 55 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 धावा केल्या. साई किशोरने ३ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळणार आहे.
 
IND vs BAN लाइव्ह स्कोअर: टिळक वर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले
टिळक वर्माने तुफानी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. 26 चेंडूंचा सामना करताना त्याने 6 षटकार आणि 2 चौकार लगावले. टिळक ५५ धावा करून खेळत आहे. भारताला विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. टीम इंडियाने 9 षटकात 92 धावा केल्या आहेत.