बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (09:20 IST)

आयपीएल युएईमध्ये होण्याची शक्यता वाढली

यंदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा भारतामध्ये होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास बीसीसीआय या काळात आयपीएल स्पर्धा घेण्याचा विचार करत आहे. परंतु, बीसीसीआयला यंदा ही स्पर्धा परदेशात घ्यावी लागू शकेल. युएई या स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार असल्याची माहिती दुबई स्पोर्ट्स सिटीच्या क्रिकेट आणि कार्यक्रमांचे प्रमुख सलमान हनीफ यांनी दिली.
 
युएई येथील स्टेडियममध्ये नऊ खेळपट्ट्या तयार आहेत, जेणेकरुन एकाच दिवशी फारसे खेळवण्यात फारशी अडचण येणार नाही. आम्ही आता इतर कोणतेही सामने त्या खेळपट्ट्यांवर घेणार नाही आहोत. त्यामुळे आयपीएल इथे घेण्याचे ठरल्यास या खेळपट्ट्या वापरता येतील, असे हनीफ यांनी युएईमधील एका वृत्तपत्राला सांगितले. आम्ही यंदा आयपीएल व्हावे यासाठी प्रयत्नशील असून ही स्पर्धा परदेशात घेण्याचीही आमची तयारी आहे, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली बरेचदा म्हणाला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा युएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.