शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2025 (19:51 IST)

हार्दिक पांड्याला मोठा झटका! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते

भारतीय क्रिकेट संघ लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला सुरुवात करणार आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार असली तरी ती फारशी महत्त्वाची नाही. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे, 
 
दरम्यान, हार्दिक पांड्यासाठी चांगली बातमी समोर येत नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच बीसीसीआयला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. आयसीसीने आधीच ठरवले आहे की सर्व सहभागी संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांचे संघ घोषित करायचे आहेत. यानंतर काही बदल करता येतील. या तारखेपर्यंत बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण संघाचा उपकर्णधार कोण होणार? याबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असू शकतो, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. 
 
याआधी हार्दिक पांड्या भारताच्या टी-२० संघाचा कर्णधारही होता. जेव्हा रोहित शर्मा हा फॉर्मेट सोडेल तेव्हा कर्णधार हार्दिक पांड्या असेल, असे मानले जात होते. पण २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सूर्यकुमार यादवला नवा कर्णधार बनवण्यात आले. आता जसप्रीत बुमराहला नवा उपकर्णधार बनवले तर तो हार्दिकसाठी मोठा धक्का असेल. आत्तापर्यंत केवळ असेच दावे केले जात असले तरी बीसीसीआयने संघ जाहीर केल्यावर आणि कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नावाबाबतचे चित्र स्पष्ट केल्यावरच याची पुष्टी केली जाईल. 
Edited By - Priya Dixit