सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (20:42 IST)

IND vs AUS 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-20 सामना,हार्दिकची झंझावाती खेळी

IND vs AUS 1st T20 : भारत  आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे.18 षटकांनंतर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. सध्या हार्दिक पांड्या 23 चेंडूत 46 धावा केल्या.

केएल राहुल फॉर्ममध्ये आला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले. राहुलने याआधी आशिया कपमध्ये सुपर फोरच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. राहुलने 32 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक झळकावले.