सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (14:50 IST)

IND vs SL 2nd Test:रोहित शर्माच्या षटकाराने फेन्सचे नाक मोडले, रुग्णालयात उपचार सुरु

भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने सहा गडी गमावून 86 धावा केल्या होत्या.
 
भारताकडून पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 98 चेंडूत 92 धावांची खेळी खेळली. याशिवाय ऋषभ पंतने 26 चेंडूत 39 धावा, हनुमा विहारीने 31 धावा आणि विराट कोहलीने 23 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा फार काही करू शकले नाही आणि 25 चेंडूत 15 धावा करून बाद झाले.
 
रोहितच्या इनिंगमध्ये एका फोर आणि षटकाराचा समावेश होता. भारताच्या कर्णधाराने विश्व फर्नांडोच्या चेंडूवर लेग साइडमध्ये हा षटकार मारला. वृत्तानुसार, रोहितने मारलेल्या षटकारामुळे एका चाहत्याचे नाक तुटले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 'डी कॉर्पोरेट बॉक्स'मध्ये 22 वर्षीय चाहता बसला होता. चेंडू लागल्याने चाहत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला प्राथमिक उपचार आणि एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले. 
 
रिपोर्टनुसार - एक्स-रेमध्ये नाकाच्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. नाकाच्या वरच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले असून टाके टाकण्यात आले आहेत.