मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (13:19 IST)

IND-W vs ENG-W: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर, झूलनचे वनडेत पुनरागमन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला T20 आणि ODI संघाची घोषणा केली. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. झुलनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याचवेळी दुखापतीमुळे 'द हंड्रेड' स्पर्धेतून माघार घेणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला संघात ठेवण्यात आले आहे. जेमिमाने राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्याने भारतीय संघ सुवर्णपदकापासून वंचित राहिला.
 
भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिका 10 सप्टेंबरपासून तर एकदिवसीय मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
 
भारतीय महिला टी-20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबबिनिनी मेघना तानिया, भाटिया  (विकेटकिपर), राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (विकेट किपर), के.पी. नवगिरी.
 
भारतीय एकदिवसीय टी20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सबिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (विकेट किपर), यास्तिका भाटिया (विकेट किपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्ज