गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 1 जून 2021 (15:09 IST)

भारतीय महिला संघाच्या कसोटी जर्सीचे अनावरण

भारताची स्टार फलंदाज जेमीमा रॉड्रिग्जने महिला क्रिकेटला सध्याच्या स्थितीत पोहोचविण्यासाठी मागील पिढीचे आभार व्यक्त केले आहेत. ती म्हणाली की, आता आमची जबाबदारी भावी पिढीसाठी चांगले व्यासपीठ तयार करण्याचचे आहे. जेमीमा आगामी इंग्लंड दौर्याच्या कसोटी सामन्यांसाठी पांढर्या जर्सीच्या अनावरणानंतर एक भावूक संदेश दिला.
 
ही जर्सी मुंबईमध्ये खेळाडूंना सोपविण्यात आली. ज्याठिकाणी महिलासंघ अद्यापही क्वारवॉरंटाइन आहे. 20 वर्षीय जेमीमा यावेळी म्हणाली की, मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वारशाविषयीची माहिती दिली. त्याची सुरुवात कोठून झाली होती व आमच्यापर्यंत तो कसा पोहोचला. यावेळी झुलन गोस्वामी व मिताली राज यांनीही आपले अनुभव कथन केले. या दोघी दीर्घ काळापासून भारतीय संघात आहेत. दरम्यान, इंग्लंड दौर्यात भारतीय संघ एमकेव कसोटी सामना खेळल्यानंतर तीन एकदिवसीय व तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.