कोरोनाच्या भीतीने क्रिकेटपटू हस्तांदोलन करणार नाहीत
इंग्लंडच्या संघाने घेतला निर्णय
कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. आता क्रिकेटवर देखील त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे क्रिकेटपटू दुसर्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने सांगितले की, त्यांच्या संघातील खेळाडू श्रीलंका दौर्यात अन्य खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोना व्हायरसचा धोका असल्याने खेळाडू श्रीलंका दौर्यात दुसर्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नसल्याचे रूट म्हणाला.
इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौर्यावर जाणार आहे. या दौर्याआधी रूट कोरोना व्हायरस संदर्भात बोलताना म्हणाला, हस्तांदोलन करणऐवजी आम्ही एकेकांना अभिवादन करू. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौर्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले होते. अनेकांना ताप आणि पोटदुखीचा सामना करावा लागला होता.
दक्षिण आफ्रिकेत आम्ही घेतलेल्या अनुभवावरून कमीत कमी संपर्क करण्याचा आमचा कल असेल. संघाच्या वैद्यकीय पथकाने व्हायरस आणि बॅक्टेरिापासून संरक्षणासाठी हा सल्ला दिल्याचे रूट म्हणाला.