T20 World Cup : टीम इंडियाला सचिनच्या शुभेच्छा
मैदानात जा आणि सर्वोत्तम कामगिरी करा. आणि माझा महिला संघातील खेळाडूंना महत्त्वाचा संदेश म्हणजे अंतिम फेरीचे दडपण घेऊ नका. शांत राहा आणि दमदार कामगिरी करा. संघ म्हणून एकत्र येऊन खेळा. संघातील खेळाडूंकडून सकारात्मक गोष्टी घ्या. मी महिला संघाचे सामने सतत पाहात आहे.
हे खेळाडू अनेक तरुणतरुणींचे प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे मैदानात जाऊन जोरदार कामगिरी करा, असा संदेश मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाला दिला आहे.