शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (10:41 IST)

MI vs PBKS: IPL 2021 :अशा प्रकारची असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2021 च्या 42 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने येतील. हा सामना अबुधाबीमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता खेळला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ गुणतालिकेत सातव्या तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत, दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोघांनी त्यांचे 10-10 सामने खेळले आहेत आणि दोघांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी चार विजय आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसाठी या सामन्यात विजय नोंदवणे खूप महत्वाचे असेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकही विजय नोंदवता आलेला नाही. दुसरीकडे, पंजाब किंग्सने गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले आहे, त्यामुळे संघाचे मनोबल थोडे वाढले असावे.
 
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव,इशान किशन,हार्दिक पंड्या,किरोन पोलार्ड,कृणाल पंड्या,अॅडम मिल्ने ,राहुल चाहर,जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
 
पंजाब किंग्ज: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल,ख्रिस गेल, एडन मार्करम,निकोलस पूरन,दीपक हुडा, हरप्रीत बरार,रवी बिष्णोई,मोहम्मद शमी,नाथन एलिस,अर्शदीप सिंग.