रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:19 IST)

India vs England: भारतीय संघाला मोठा झटका, रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या घरेलू कसोटी मालिकेत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर जडेजाला सिडनी कसोटीदरम्यान डाव्या हाताच्या अंगठाची दुखापत झाली आणि यामुळे त्याचा अंगठा फ्रैक्चर झाला. त्याच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया झाली आहे आणि बरे होण्यासाठी कमीतकमी सहा आठवड्यांचा कालावधी लागेल. इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 
 
भारतीय दौर्‍यावर इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी -20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे तर उर्वरित दोन कसोटी सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होतील. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जडेजाच्या टी -२० आणि एकदिवसीय मालिकेत सहभागाबाबत निर्णय नंतर घेण्यात येईल. 
 
दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात 32 वर्षीय जडेजाचे नाव नव्हते. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेन येथे होणार्‍या अंतिम आणि शेवटच्या कसोटी सामन्यातही जडेजा सहभागी होऊ शकला नाही. 
 
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रिद्धिमन साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा , मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल.