1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (16:00 IST)

तुम्ही सात कोटीचा रेडा (male buffalo) बघितला आहे का?

हरयाणेचा हा रेडा कदाचित जगातील सर्वात महाग रेडा असेल, जो हैदराबाद येथे सुरू असलेल्या पशू मेळ्याचा स्टार बनला आहे. युवराज नावाच्या या रेड्यासाठी एक व्यक्ती सात कोटी देण्यास तयार होता, पण याचा मालक कर्मवीर सिंग अस्विकार केले, त्यानंतर हा रेडा याच नावाने प्रसिद्ध झाला.  
 
कर्मवीर सिंह यांच्या मते हा रेडा यापेक्षाही जास्त सक्षम आहे. वर्षभरात याच्या वीर्याची विक्री करून किमान 80 लाख ते एक कोटी रुपयांची कमाई केली जाते. अशात हा रेडा मालकासाठी पैशे बनवण्याची मशिनीसारखा आहे.  
 
किमान 6.5 फीट लांब आणि किमान 1,600 किलोग्राम वजनी युवराज 'मुर्रा' जातीचा रेडा आहे. या एका वेळा किमान पाच मिलीलीटर वीर्य उत्पन्न करतो आणि याचे 0.25 मिलीलीटर वीर्य 1,000 रुपयांपर्यंत विकले जाते.  
 
युवराजच्या मालकाचे म्हणणे आहे की, 'उत्तम जातीशिवाय याला रोज नाश्त्यात 100 सेब, 20 लीटर दूध, 15 किलो अनाज आणि सूखा मेवा खायला दिला जातो. त्याशिवाय थंडीत त्याला थोडी दारू देण्यात येते.  
 
त्या शिवाय दिवसातून दोन  वेळा या युवराजची सरसोच्या तेलाने मालीश केली जाते. युवराजचे मालक याच्या देखरेखसाठी 10  लोकांना ठेवले आहे.  त्याच्या मालकाचे म्हणणे आहे की दररोज आम्ही युवराजावर 3,000 ते 3500 रुपये खर्च करतो. काही लोकांनी मला याच्यासाठी सात कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. पण मी त्याला अस्विकार केले  कारण तो मला माझ्या मुलासारखा आहे.