शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (17:14 IST)

E-cigarettes कडे तरुण मुलामुलींचा कल, सिगारेट ते ई-सिगारेट एक विशेष रिपोर्ट

नाशिक शहरात ई-सिगारेट कडे तरुण मुलामुलींचा कल वाढत चालला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ई सिगारेट विरोधी कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान आता पोलिसांचा ताफा ई सिगारेटकडे वळाला असून यातही पोलिसांनी सापळा रचत कॉलेज रोड परिसरातदोन संशयितांसह ८८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या ९ निकोटिन युक्त ई सिगारेटच्या बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये वेगवेगळया फ्लेवरचे प्रतिबंधित असलेले ८० नग निकोटिनयुक्त ई सिगारेट किंमत रुपये ८७ हजार ९०० रुपये किंमतीचे बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास सुरु आहेत.
 
वरील बातमी तुम्ही वाचली तर तुम्हाला तुमच्या शहरात देखील अश्या बातम्या वाचयला मिळत असतील, मात्र तरुण आज ई-सिगारेटचा व्यसन म्हणून वापर करणारे अनेक जण आहेत. त्याचे व्यसनही झपाट्याने वाढत आहे. विशेषत: तरुणांमध्ये त्याची क्रेझ म्हणून ती सावरत आहे. जो चिंतेचा विषय आहे. बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की सामान्य सिगारेटमुळे नुकसान होऊ शकते, परंतु ई-सिगारेट पूर्णपणे सुरक्षित आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. ई-सिगारेट ओढणंही आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे हृदयाचे गंभीर नुकसान देखील होऊ शकते. दररोज ई-सिगारेट ओढणाऱ्यांचे हृदय आणि रक्तवाहिन्या बिघडतात आणि अनेक समस्या उद्भवू लागतात. जाणून घेऊयात ई-सिगारेटचे तोटे. महाराष्ट्रात ई-सिगारेटवर बंदी आहे. मात्र तरिही ही बंदी झुगारून सर्रासपणे ई-सिगारेट विक्रीचा काळा बाजार सुरु असल्याचं अधोरेखित झालं आहे.  ई-सिगारेटचे तोटेह पूर्ण रिपोर्ट नक्की वाचा :--
 
ई-सिगारेट आणि सामान्य सिगारेटमधील फरक -
सामान्य सिगारेटमध्ये तंबाखू आणि निकोटीन असते, तर ई-सिगारेटमध्ये फक्त निकोटीन असते. निकोटीन आपल्याला त्याचे व्यसन लावू शकते. सामान्य सिगारेटपेक्षा ई-सिगारेट कमी हानिकारक असतात असा समज आहे,  . मात्र ई-सिगारेटचा धूर इतर धूम्रपान करण्यासारख्याच फार धोकादायक आहे.
ई-सिगारेट म्हणजे काय रे भाऊ ?
ई-सिगारेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरीवर चालणारे छोटे उपकरण आहे. श्वास आत घेताना या यंत्राद्वारे निकोटीनसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये वापरले जाणारे द्रव आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. ई-सिगारेटमधून राख तयार होत नाही. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना जळणाऱ्या खऱ्या सिगारेटप्रमाणे तो लाइट प्रकाशमान होतो. खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ई-सिगारेटचा पर्याय दिला जातो. ई-सिगारेटमुळे दातांवर काळे पडत नाही. ई-सिगारेटचा आकार व बाह्यस्वरूप अत्यंत आकर्षक असते. अनेकदा हा आकार खऱ्या सिगारेटसारखा केला जातो. त्यामुळे तरुणाई याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असते.
 
सिगारेट शरीरासाठी अतिशय नुकसानदायक  
तंबाखू सेवनाने होणारे आजारच ‘ई-सिगारेट’मुळे होतात. कॅन्सर, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), दमा, अस्थमा, किडनी खराब होणे, अॅसेडिटी, आतड्यांचे आजार, कॅन्सर आदी आजार ‘ई-सिगारेट’मुळे होऊ शकतात.
ई-सिगारेट पिणारे आणि आजूबाजूचे लोक दोघांचेही नुकसान करतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
ई-सिगारेटमध्ये कार्सिनोजेनिक घटक आढळतात, जे मानवांसाठी कोणत्याही ‘विषारा’ पेक्षा कमी नाहीत, जगभरातील शास्त्रज्ञांनी ते न पिण्याचा सल्ला दिला आहे.
ई-सिगारेटमध्ये निकोटीन असते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो आणि जर कोणी त्याचा सतत वापर करत असेल तर त्याचे वाईट व्यसनात रूपांतर होते.
ई-सिगारेट पिण्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतो आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
 
तरुणपणी हृदयविकाराचा धोका वाढला -
गेल्या काही वर्षांत जगात हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. विशेषतः तरुणही हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडत आहेत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी लोकांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला जातो, परंतु तरीही मोठ्या संख्येने लोक धूम्रपान करतात. धूम्रपान सोडल्यानंतर वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठीही जावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
आरोग्य तज्ज्ञाच्या मते, ई-सिगारेट कमी हानीकारक असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ई-सिगारेट मधून बाहेर येणाऱ्या धूरात निकोटीन आणि इतर विषारी पदार्थ असतात जे ई सिगारेट वापरणाऱ्यांसाठी आणि न वापरणाऱ्यांसाठी दोघांसाठीही घातक आहेत.
 
भारतासाठीच नव्हे तर जगासाठीची खूप मोठी समस्या
ई सिगारेट किंवा इलेक्ट्रोनिक निकोटीन डिलीवरी सिस्टम अशी याची नाव आहेत. या ई सिगारेटचा तरूणांमधला वापर भारतासाठीच नव्हे तर जगासाठीची खूप मोठी समस्या झाली आहे. या डिवाइसच्या निर्मिती कंपन्यांनी असा दावा केलेला की हे डिवाइस वापरण धोक्याच नाहीये, पण यावरती आता WHO सकट अनेक संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तरूणांमधल्या या वाढत्या व्यसनाला रोखण्यासाठी सिंगापूर, ब्राझिल, थायलंड अशा जवळजवळ 45 देशांनी हे ई सिगारेट डिवाइस बॅन केल आहे.
 
WHO च्या मते, ई-सिगारेटचे हानिकारक प्रभाव, मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळा आणण्यापासून ते गर्भवती महिलांच्या गर्भावर परिणाम करण्यापर्यंत दिसून आले आहेत. यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.
 
ई-सिगारेट हे एक फॅशन स्टेटमेंट
आता ई-सिगारेट हे एक फॅशन स्टेटमेंट आणि ऍक्सेसरी बनल आहे शिवाय ते वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि आकारांमध्ये तरुणांना विकले जाते. टीनेजर्स मध्ये हे प्रमाण वाढते आहे. अमेरिकेतील नॅशनल युथ टोबॅको सर्व्हेनुसार, तब्बल 2.5 दशलक्ष टिनेज मुल ई-सिगारेट वापरतात
 
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा..
 
Edited by: Ratnadeep Ranshoor