शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (11:20 IST)

पोस्टात नोकरीची संधी, दहावी पास करू शकतात अर्ज

भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाक सेवक (India Post GDS Recruitment) भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करु शकतात. या सरकारी नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवून 29 मे 2021 करण्यात आली आहे. आधी अर्ज करण्यासाठी मुदत 26 मे होती.
 
पदांची तपशील
एकूण 2428 पद
महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये 
ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)
असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/ग्रामीण डाक सेवक (GDS) 
 
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण. 
दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास अनिवार्य.
 
निवड
दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार. 
दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार.
 
तांत्रिक पात्रता
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 60 दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट अनिवार्य.
दहावीत उच्च शिक्षणात कॉम्प्युटर एका विषयाच्या रुपात अभ्यासला असल्यास कॉम्प्युटरच्या बेसिक माहितीच्या सर्टिफिकेट अनिवार्यतेतून सवलत.
 
वयोमर्यादा
किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे. 
वयाची गणना 27 एप्रिल 2021 पासून होईल.
 
अधिक माहितीसाठी 022'22626214 या क्रमांकावर संपर्क करु शकता. किंवा [email protected] या इमेलवर संपर्क साधू शकता.