बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 15 एप्रिल 2019 (10:38 IST)

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात

ज्योतिष शास्त्रानुसार काही विशेष झाडांची पूजा केल्याने आमच्या पत्रिकेतील दोष दूर होतात तसेच जीवनातील बर्‍याच अडचणी देखील दूर होण्यास मदत मिळतात. तर जाणून घेऊ कोणत्या झाडांची पूजा केल्याने त्याचे आम्हाला काय फायदा मिळतो.
तुळस – ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते.

पिंपळ – हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.
कडू लिंबं – याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.
 
वडाचे झाड – याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे. 

बेलाचे झाड – या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.

आवळा – या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणार्‍यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.

अशोक – या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहत. एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते.
केळीचे वृक्ष – ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर, त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो. याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात.

शमी – या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात. दसर्‍याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते.

लाल चंदन – सूर्याशी निगडित गृह दोष दूर करण्यासाठी लाल चंदनच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे. असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात.