1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (18:49 IST)

Shani Kripa या लोकांवर असते नेहमी शनीची कृपा

shani
शनिदेवाला शास्त्रांमध्ये न्यायाधीशाची उपमा मिळाली आहे. अर्थात चांगले कामांचे फळ चांगले आणि वाईट कामांचे वाईट फळ. जर कोणावर शनीची क्रूर दृष्टी पडेल तर त्याचे सर्व काम अपयशी ठरतात, पण तसेच त्याची दृष्टी चांगली पडली तर तो व्यक्ती वैभव आणि धन संपदेने मालामाल होऊन जातो. रोज आमच्या जीवनात अशा काही सवयी असतात ज्यामुळे शनीची आमच्यावर कृपा आहे की नाही. जाणून घेऊ त्या सवयींबद्दल.  
 
गरिबांना दान 
जे लोक नेहमी गरिबांना आणि गरजू लोकांना दान आणि मदत करतात त्यांच्यावर शनीची विशेष कृपा असते. म्हणून जर तुम्हाला ही शनीची कृपा हवी असेल तर नेहमी दान करण्याची सवय टाका.  
 
नख कापणे 
जे लोक काही विशेष दिवस सोडून नेहमी आपले नख कापतात आणि त्यांना स्वच्छ ठेवतात शनीदेव असे करणार्‍यांना नेहमी प्रसन्न असतात.  
 
कुत्र्यांची सेवा
जे लोक कुत्रांची नेहमी सेवा करतात त्यांच्यावर शनीदेव नेहमी प्रसन्न राहतात. या सवयीमुळे तुम्ही जन्मभर शनीच्या प्रकोपापासून स्वत:चा बचाव करू शकता.  
 
शनिवारचा उपास 
शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी शनिवारी उपास करून शनीला प्रसन्न करू शकता. जे लोक नेहमी शनिवारचा उपास ठेवतात त्यांना कधीही जीवनात रुपयांची कमी होत नाही.  
 
पिंपळाची पूजा  
जी व्यक्ती नेहमी पिंपळ आणि अवदुंबराची पूजा करतात त्यांच्यावर शनी आपली कृपा नेमही ठेवतो. म्हणून नेहमी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावायला पाहिजे.  
 
रुद्राक्ष धारण करणे  
जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यासाठी शनी देव भाग्याचे दार नेमही उघडे ठेवतात. म्हणून शनीची कृपा मिळवण्यासाठी रुद्राक्ष जरूर धारण करावे.