रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Shani Amavasya : केवळ एक झाड लावल्याने शनी दोषापासून मिळेल मुक्ती

आज दर्श अमावास्या आहे. योगयोग ही अमावास्या शनिवारी असल्यामुळे याला शनिश्चरी अमावस्या देखील म्हणतात. शास्त्रांप्रमाणे या अमावास्याचे अत्यंत महत्तव आहे.
 
आज पितरांची पूजा यासोबतच शनीदेवाची पूजा केल्याचे विशेष महत्तव आहे. आज शनीदेवाची पूजा केल्याने शनी देव खूश होऊन जातात. तसेच कुंडलीत शनीच्या अशुभ प्रभावामुळे शनी संबंधित समस्या जसे साडे साती, ढैय्या किंवा कालसर्प योग सारख्या समस्या येतात. परंतू शनीची आराधना केल्याने यापासून वाचता येऊ शकतं. शनी देवी कर्मफल दाता आहे, न्याय करणारे देव आहे. शनीदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फल देतात.
 
तर एक सोपा उपाय शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी
 
आपल्या कुंडलीत किंवा लक्षणामुळे हे जाणवत असेल की आपल्या शनी दोष आहे, सर्व कार्यात अडथळे येत आहे, अनेक कामांमध्ये यश हाती लागणार अगदी त्याआधीच काही अडचणी निर्माण होत आहे तर शनिश्चरी अमावस्या च्या दिवशी घरात शमी ज्याला काही लोकं खेजडी देखील म्हणता त्याचे झाड लावावे. आपण कुंड्यात झाड लावून त्याभोवती काळे तीळ घाला.
 
‘शमी शम्यते पापं’, अर्थात शमीचे झाड पापांचे शमन करतं आणि समस्यांपासून मुक्ती देतं. म्हणून या दिवशी शमी वृक्ष लावण्याचे महत्तव आहे. वृक्ष लावून त्यापुढे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ॐ शंयो देविरमिष्ट्य आपो भवन्तु पीतये, शनियोरभि स्तवन्तु नः मंत्र 11 वेळा जपावा. याने शनी देव प्रसन्न होतील आणि लवकरच आपल्याला समस्या सुटतील.
 
तसेच शनी चा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात आपली सावली बघावी आणि शनी मंदिरात जाऊन ती तेलाची वाटी ठेवून यावी. वाटी पुन्हा घरी आणू नये.
 
तसेही शनी न्यायप्रिय देवता आहे म्हणून वाईट कामांपासून दूर राहणार्‍यांना शनीपासून घाबरण्याचे काहीही कारण नाही, छल-कपट न करणारे, कोणाही त्रास न देणारे असे सज्जन लोकांना या ग्रहाचा कधीच त्रास होत नसतो.