बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पत्नी पाय दाबत असेल तर पतीचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही

हिंदू धर्मात रूढींना अधिक मान्यता आहे. त्यातली एक प्रथा म्हणजे पत्नीने पतीचे पाय दाबणे. पण नवऱ्याचे पाय दाबणे सेवा की प्रेम की नेहमीप्रमाणे हाच प्रश्‍न की पत्नीनेच का पतीचे पाय दाबावे? तर यामागे काय कारण आहे माहीत आहे का? अखेर पत्नी पतीचे पाय का दाबते? तुम्ही हे देखील पाहिलं असेल की देवी लक्ष्मी देखील भगवान विष्णूच्या पायाजवळ बसते आणि सतत त्यांचे पाय दाबत असते. यामागे धार्मिक कारण काय आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या-
 
पत्नी पतीचे पाय का दाबते?
धार्मिक मान्यतेनुसार पतीच्या पायात गुडघ्यापासून ते बोटापर्यंत शनिदेवांचा वास तर पत्नीच्या हाताच्या मनगटापासून बोटापर्यंत शुक्रदेव वास करतात. असे मानले जाते की जेव्हा शुक्र आणि शनि एकत्र येतात किंवा शुक्राचा शनीवर प्रभाव असतो तेव्हा पैशाचा पाऊस पडतो. लक्ष्मी देवी भगवान विष्णूंचे पाय दाबते, म्हणून त्यांना संपत्तीची देवी म्हणतात.
 
पतीचा खिसा कधीच रिकामा राहत नाही
जी पत्नी पतीचे पाय दाबते ती जीवनात सुखी राहते. तसेच नवऱ्याचा खिसा कधीच रिकामा नसतो. म्हणजेच पत्नीचे पाय दाबून पती कधीही धनहीन होत नाही. बायकोचे पाय दाबल्याने घरात भाग्य उजळतं आणि घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
 
डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही। कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.