शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

सावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा..

आपल्यावर अनेकवेळा अशी वेळ येते की आपल्याला पेनकिलर गोळ्या घ्याव्या लागतात. विशेष करून आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या रुग्णांना अधिक प्रमाणात पेनकिलरचे सेवन करण्याची सवय होऊन जाते. अशा रुग्णांना हृदयरोगाचा त्रास असेल तर या गोळ्या खूप खतरनाक सिद्ध होऊ शकतात. 
 
अधिक प्रमाणात पेनकिलरचा वापर केल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते. काही स्ट्राँग पेनकिलरने ब्लड प्रेशरही वाढू शकते किंवा कोलेस्ट्रोलचा स्तर वाढू शकतो. ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलरचे सेवन करत असतील तर त्यांनी डॉक्टरांकडूनच या पेनकिलरच्या दुष्परिणामांची माहिती घेतली पाहिजे. स्वत:च्या मर्जीनुसार गोळ्यांचे सेवन करणे टाळावे. खूपच गरज असेल तर पॅरासिटामोलसारखी हल्की पेनकिलरचा वापर तुम्ही करू शकता. परंतु ही सवय बनवू नका.