बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (09:18 IST)

नेहमी ब्लॅडर भरलेले वाटत असेल तर या मागे हे 10 कारणे असू शकतात

जर आपण असे समजत आहात की जास्त लघवी निघणे म्हणजे अधिक चांगले डिटॉक्स आहे, तर आम्ही हे सांगत आहो की असे काहीच नाही. जास्त लघवी होणे बऱ्याच आरोग्याच्या समस्येचे लक्षण देखील असू शकतात. बऱ्याच वेळा परिस्थिती इतकी गंभीर होते की ब्लॅडर वर नियंत्रण देखील राहत नाही. सांगू इच्छितो की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त वेळा लघवी करण्याची इच्छा होते. आज या लेखात वारंवार लघवी येण्या मागील 10 कारणे जाणून घ्या.
 
यूटीआय असू शकतो- 
यूटीआय म्हणजे यूरिनरी ट्रेक संसर्ग म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग वारंवार लघवी येण्याच्या सामान्य कारणांपैकी एक आहे. दुर्देवाने हे संसर्ग स्त्रियांमध्ये सामान्य आहे. एका अभ्यासानुसार सुमारे 60 टक्के स्त्रियांमध्ये यूटीआयची समस्या उद्भवते. या कारणास्तव त्यांना वारंवार लघवी होते. यूटीआय मुत्राशयाला ट्रिगर करतो ज्यामुळे वारंवार लघवी होते.
 
जास्त कॉफीच्या सेवन केल्याने -
कॉफी किंवा अशी कोणती वस्तू जे यूरीन वाढवते, जास्त लघवी करण्यास बाध्य करते. जेव्हा आपण असे कोणतेही पेय पिता तेव्हा किडनी जास्त प्रमाणात सोडियम सोडते, ज्यामुळे अधिकाधिक लघवी करण्याची इच्छा होते. म्हणून कॉफी जास्त घेत आहात तर सामान्यांपेक्षा अधिक प्रमाणात लघवी होते.
 
तणाव ग्रस्त किंवा काळजीत असाल - 
तज्ञांच्या मते, ताण तणाव करणे मूत्राशयासाठी चांगले नाही. हेच कारण आहे की हे जास्त लघवी करण्यासाठी ट्रिगर होते. या मुळे आपण वारंवार लघवी करता.
 
गरोदर असाल तर, बाळामुळे मूत्राशयावर दाब पडतो - 
गरोदरपणात मूत्राशयावर दाब पडतो. गरोदरपणात लघवी होणं ही सामान्य बाब आहे. प्रत्येक महिला या मधून जाते. वास्तवात जेव्हा गर्भ वाढतो तेव्हा मूत्राशयावर अतिरिक्त ताण पडतो म्हणून  काहीही खाल्ल्याने किंवा प्यायल्याने लगेचच बाळाने घेतलेला दाब लघवी करण्यास प्रवृत्त करतो. 
एका अहवालानुसार गरोदर महिलांमध्ये मूत्रमार्गातील असंयम अधिक  सामान्य गोष्ट आहे.
 
मधुमेह असू शकतो -
बहुतेक मधुमेहाचे रुग्ण एका लक्षणांची नोंद अत्यधिक तहान म्हणून नोंदवतात. या मुळे ते द्रव्य पदार्थांचे अधिक सेवन करतात, हेच कारण आहे की ते बऱ्याच वेळा लघवी करतात. जर हा त्रास आपल्याला जाणवत आहे तर  आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या.

मूत्राशय जास्त प्रमाणात काम करेल - 
ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर किंवा OAB अशी स्थिती आहे जेव्हा मूत्राशयाच्या स्नायू अत्यंत संवेदनशील बनतात. या विकारामध्ये जास्त वेळा लघवी केली जाते. असे लोक रात्री देखील दोन किंवा अधिक वेळा लघवी करण्यास जातात.
 
आपल्याला वेजाइनिटिस होऊ शकतो - 
खमीर असो किंवा बॅक्टेरिया काही फरक पडत नाही - जर योनीमार्गात संसर्ग आहे, तर वारंवार लघवी होते. किंवा संसर्ग पासून मुक्त होण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे देखील वारंवार लघवी होऊ शकते.

पेल्विक स्नायू कमकुवत असल्यास- 
तज्ञांच्या मते, कमकुवत पेल्विक फ्लोरच्या स्नायूंमुळे देखील मूत्र असंयम होऊ शकतो. मूलभूतपणे अशक्त पेल्विक स्नायूंना दीर्घकाळापर्यंत लघवी रोखणे कठीण जाते. म्हणून त्वरितच लघवी करायला जावे लागते.
 
बद्धकोष्ठता होऊ शकते -
आतडे स्वच्छ नसल्यास मूत्राशयावर अतिरिक्त दाब पडतो. परिणामी अधिक वेळा शौचास जावे लागते. बद्धकोष्ठतेमुळे पेल्विक फ्लोरच्या स्नायू कमकुवत होतात.
 
झोप न येण्याचा आजार असू शकतो -  
जेव्हा आपण खूप झोपेत असता आपले शरीर मेंदूला ADH हार्मोन सोडण्याची सूचना देतो. हे हार्मोन शरीराला लघवी धरून ठेवण्याची सूचना तो पर्यंत देतो जो पर्यंत आपण उठून जात नाही. जर झोप न येणाचे आजार म्हणजे स्लीप एपनिया आहे तर हे हार्मोन आपल्या शरीराद्वारे सोडला जाणार नाही. या मुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि किडनीला पाणी सोडावे लागते. यामुळे लघवी लागते. 
 
वारंवार लघवी येणं हे संपूर्ण आरोग्याला सूचित करतो. म्हणून जेव्हा लघवीला जाता तर किती वेळा जात आहात या कडे लक्ष द्या, कारण दिवसातून सहा ते आठ वेळा जात असाल तर ठीक आहे जर ही संख्या या पेक्षा जास्त आहे तर त्वरितच चिकित्सकाला दाखवावे.