शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (20:47 IST)

Health Tips:नाश्त्यात चहासोबत या गोष्टी खाल्ल्याने पोटाची चरबी वाढते

वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपला आहार हेल्दी असल्याशिवाय आपण वजन कमी करू शकत नाही. विशेषत: वजन कमी करण्यात आणि वाढवण्यात आपण केलेल्या नाश्त्याची भूमिका खूप असते. अशा काही गोष्टी आहेत ज्या न्याहारीत घे तल्याने आपल्या शरीरातील साखर आणि चरबीची पातळी वाढते, त्यामुळे नाश्त्यामध्ये काही गोष्टी अजिबात खाऊ नयेत.
 
1 भात -सकाळी सकाळी भात खाल्ल्याने पोटाची चरबी झपाट्याने वाढते. जर आपल्याला भात खावासा वाटत असेल तर ब्राऊन राईस किंवा राईसमध्ये भरपूर भाज्या घालून खाऊ शकता, परंतु हे आठवड्यातून एकदाच करा. दररोज भात खाणे टाळावे.
 
 
2 बिस्कीट -सकाळी चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने आपण भूक नियंत्रित ठेवू शकता, परंतु त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढू लागते, त्यामुळे सकाळी बिस्किटे किंवा कुकीज खाण्यास टाळा.
 
3 नूडल्स -नूडल्स हे खायला खूप आवडतात. पण त्याला हेल्दी ब्रेकफास्ट मानता येत नाही, म्हणूनच नाश्त्यात नूडल्स अजिबात खाऊ नयेत. 
 
4 फरसाण -चहासोबत फरसाण खाणं देखील अनेकांना आवडते, परंतु फरसाण मध्ये तळण असतं, त्यामुळे त्यात भरपूर चरबी असते. चहासोबत फरसाण खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच  झपाट्याने वाढते.
 
5 भजे -समोसे-कचोरी  -सकाळी चहासोबत तळलेले गरिष्ठ पदार्थ खाणे अजिबात योग्य नाही. भजे, समोसे, कचोरी यांसारख्या तळलेल्या गोष्टी सकाळी खाल्ल्या नाहीत तर ते आरोग्यासाठी चांगले राहील.