गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (16:10 IST)

'क' जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे धोका वाढतो

'क' जीवनसत्वयुक्त पूरक औषधे म्हणजे सप्लिमेंट्‌सच्या अतिरेकामुळे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी निर्माण होतात. दिवसभरात 2000 मिलिग्रॅमपेक्षा अधिक क्षम तेची 'क' जीवनसत्त्वयुक्त पूरक औषधे घेतल्यास जुलाब, मळमळणे, अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या उद्‌भवू शकतात.
 
*'क' जीवनसत्त्व शरीराला लोह शोषून घ्यायला मदत करते. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे शरीर लोहही अधिक प्रमाणात शोषून घेईल. लोहाच्या अतिप्रमाणामुळे यकृत, हृदय, थायरॉइड, स्वादुपिंड तसेच मज्जासंस्था यांना नुकसान पोहचू शकते.
 
* 'क'जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे मूतखड्याचा धोका वाढतो. हे जीवनसत्त्व ऑक्सालेटच्या रुपात मूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जाते. 'क' जीवनसत्त्व अधिक प्रमाणात घेतल्यास मूत्रातल्या ऑक्सालेट या घटकाचे प्रमाण वाढून खडे किंवा स्फटिक तयार होण्याची शक्यता वाढते.
 
* 'क' जीवनसत्त्वाचे अतिसेवन टाळण्यासाठी सप्लिमेंट्‌स घेऊ नयेत. लिंबू, संत्र, मोसंबी, टोमॅटो, पेरु अशा 'क' जीवनसत्त्वाच्या नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहिल्यास या घटकाचे अतिसेवन टाळता येते.
 
डॉ. महेश बरामदे