रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)

छातीच्या जळजळ पासून त्रस्त आहात? मग हे करून बघा

छातीत जळजळ होणे ही एक सामान्य बाब आहे. जी प्रत्येकास होते. वास्तविक, ज्या वेळी लोकं जास्त चमचमीत आणि तळकट खातात त्यावेळी त्यांना हा त्रास होतो. या व्यतिरिक्त पोटात आम्ल तयार झाल्यावर देखील छातीत जळजळचा त्रास होतो. कधी-कधी असेही आढळून येतं की विशेष अन्न खाल्ल्यावर किंवा रात्रीच्या वेळी छातीत जळजळ होण्याची वेदना होते. कधी कधी असे ही होतं की झोपल्यावर, वाकल्यावर, दुखणं वाढतं. या मुळे माणूस काही ही करू शकतं नाही. त्याला कुठे देखील बसता येतं नाही. यावर घरगुती उपाय जाणून घ्या- 
 
* छातीत जळजळ होण्याचा त्रासांमध्ये फायदेशीर आहे आलं -
आलं औषधीगुणांनी समृद्ध मानली जाते. छातीच्या जळजळच्या त्रासासाठी देखील हा प्रभावी उपाय आहे. कधी ही जेवण केल्यानंतर आपल्या छातीत जळजळ होतं असल्यास, आलं चावून चावून खावं किंवा आल्याचा चहा देखील बनवून पिऊ शकता. या मुळे आराम मिळेल.
 
* थंड दूध देखील जळजळ कमी करतं -
दूध तर शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं, हे छातीची जळजळ कमी करण्यासाठी देखील प्रभावी उपाय आहे. यासाठी आपण एक ग्लास थंड दुधाचं सेवन करावं किंवा त्या मध्ये एक चमचा मध मिसळून देखील पिऊ शकता. या मुळे छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून बराच आराम मिळेल.
 
* आवळा देखील जळजळमध्ये आराम देतो -
आवळ्याचं सेवन केल्यानं आपण बऱ्याच आजारापासून वाचू शकता. छातीतल्या जळजळला दूर करण्यासाठीच्या उपायांमध्ये हे एक प्रभावी उपाय आहे. यासाठी आपण कच्चा आवळा देखील खाऊ शकता. किंवा आपण अर्धा चमचा आवळ्याची भुकटी करून त्याला एक ग्लास पाण्यासह घेणं अधिक सोयीस्कर आहे. हे आपल्या छातीच्या जळजळीला त्वरा शांत करतं.
 
* छातीच्या जळजळीत केळ देखील फायदेशीर आहे -
केळ हे अतिशय फायदेशीर फळ आहे, ज्यामुळे छातीत जळजळ शांत करण्यास मदत करतं. म्हणून जर का आपल्याला छातीत जळजळ होण्याचा त्रास होतं असल्यास त्वरित केळ खा. या मुळे आपल्या छातीतली जळजळ देखील शांत होईल आणि आपल्याला आराम मिळेल.
 
* टीप - हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी देत आहोत, आपल्याला काहीही आजार असल्यास किंवा ह्याचे सेवन करण्यापूर्वी त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.