शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:15 IST)

डोळ्याच्या कर्करोगाचे लक्षण, कारणे आणि उपचार जाणून घ्या

eyes cancer
प्रत्येक आजार धोकादायक असला तरी जेव्हा जेव्हा कॅन्सरचे नाव आले तर खूप घाबरायला होतं. कारण या आजाराचे निदान जेवढे अवघड आहे त्यापेक्षा जास्त त्याचा उपचार अधिकच महागडा आहे. म्हणूनच,प्रत्येकाने चांगल्या प्रकारे स्वत: ची पूर्ण काळजी घेणे आणि खबरदारी घेणं महत्वाचे आहे. कॅन्सर कोणताही असो या आजारामुळे रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय पूर्णपणे खचून जातात. आज आपण डोळ्याच्या कर्करोगाविषयी जाणून घेऊ या. 
बरीच वेळा अंधुक दिसू लागले की आपल्याला वाटते की कदाचित डोळ्यांचा नंबर वाढलेला असावा. आणि आपण या कडे दुर्लक्षित करतो. पण डोळ्यात अंधुक दिसण्याचे कारण काही वेगळे असू शकतात. 
 
बऱ्याच वेळा आपण डोळ्याने अंधुक दिसणे आणि पापण्यांवर गाठी होण्या सारख्या त्रासाकडे  दुर्लक्षित करतो आणि जेव्हा हे समजते की हा त्रास सादासुदा नसून डोळ्यांचा कर्करोग आहे. तो पर्यंत फार उशीर झालेला असतो. हे काही संकेत आहे ज्यांना ओळखून आपण या जीवघेण्या आजारांपासून वाचू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 डोळ्यांचा कर्करोग- डोळ्यांच्या पेशींमध्ये अचानक होणाऱ्या वाढीला डोळ्यांचा कर्करोग म्हणतात. डोळ्यांच्या पेशी वाढल्यामुळे पेशी सर्वत्र पसरू लागतात. डोळ्यांच्या कर्करोगामुळे डोळ्यांच्या बाहेरील भागाला जास्त त्रास होतो. हा मेलॅनोमा कर्करोग डोळ्यांच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे.पण भुभुळांच्या आत होणाऱ्या कॅन्सरला इंट्राक्युलर कॅन्सर म्हणतात. या व्यतिरिक्त डोळ्याचे इतर कॅन्सर देखील आढळतात. जे डोळ्यांच्या पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश करतात.
 
 लहान मुलांमध्येही डोळ्यांच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात. रेटिनोब्लास्टोमा हा मुलांमधील डोळ्यांचा सामान्य कर्करोग आहे, जो डोळ्याच्या रेटिनल पेशींना संक्रमित करतो. जरी डोळ्यांच्या कर्करोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात, परंतु प्रदूषण आणि रसायनांच्या संपर्कात असलेल्या लोकांमध्ये असे होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने रुग्ण दगावू शकतो. डोळ्याच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेऊ या. 
 
2 डोळ्यांच्या कर्करोगाची लक्षणे- 
* डोळ्यांना वेदना न होता दृष्टी अधू होणे.
* डोळ्यात प्रकाश चमकणे.
* अस्पष्ट सावली दिसणे.
* डोळ्याचा आतील बाजू फुगणे 
 * पापण्यांवर गाठी होणे.
* अंधुक दिसणे किंवा अंधुक दृष्टीसह डाग दिसणे.
 
3 डोळ्यांच्या कर्करोगाचे कारण-
डोळ्यांचा कर्करोग होण्याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु अनेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की डीएनएची कमतरता आणि प्रभावित निरोगी पेशी डोळ्यांच्या कर्करोगाचे कारण असू शकतात.
 
4 या लोकांना डोळ्यांच्या कर्करोगाचा धोका असतो - 
डोळ्यांचा कर्करोग 50 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना होऊ शकतो. वयाच्या 70 व्या वर्षी नंतर डोळ्यांचा कर्करोग होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. पांढर्‍या जातीच्या लोकांना म्हणजे कॉकेशियन लोकांना मेलेनोमा कर्करोग होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. ज्या लोकांना त्वचेत पिगमेंटेशन, तीळ, चामखीळ यांसारख्या समस्या आहेत, त्यांना डोळ्यांचा कर्करोगही होऊ शकतो. जे लोक सतत सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहतात त्यांनाही डोळ्यांच्या कर्करोगाचा धोका संभवतो.
 
5 अशा प्रकारे करा डोळ्यांच्या कर्करोगाचे निदान - 
डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. - डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्ट्रासाऊंड करून घ्या. हे डोळ्यांच्या मेलेनोमाच्या चाचणीसाठी वापरले जाते. अल्ट्रासाऊंडच्या मदतीने डोळ्यातील गाठीची जाडी ओळखता येते, त्यानंतर डॉक्टर त्याच्या आधारे उपचार सुरू करतात. अल्ट्रासाऊंड व्यतिरिक्त, डॉक्टर पिवळ्या रंगाचा वापर करतात. सर्वप्रथम हा डाई शिरामध्ये घातला जातो. यंत्राद्वारे डोळ्यांचे छायाचित्र काढले जाते. या प्रतिमांद्वारे डोळ्यातील रंगाचा प्रवाह दिसतो आणि त्याच्या आधारे डॉक्टर डोळ्यांच्या कर्करोगाचे निदान करू शकतात.