गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (15:26 IST)

कोरोना काळात घरातून बाहेर पडताना ही काळजी घ्या

कोरोनापासून वाचण्यासाठी काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काळजी घेऊन आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. घरातून बाहेर पडताना काय काळजी घ्यावयाची आहे जाणून घेऊ या. 
 
* घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा. वर्दळीच्या ठिकाणी आपल्याला मास्क लावायचा आहे. जेणे करून आपण कोरोनाव्हायरस पासून वाचू शकाल. आपण एकटे असताना मास्कचा वापर करू नका. 
 
* लिफ्टचा वापर करताना किंवा दार उघडताना बोटांचा स्पर्श करणे टाळा या साठी आपण कोपऱ्याचा वापर करा. किंवा आपल्या बरोबर टिशू बाळगा. 
 
* खोकताना किंवा शिंकताना आपल्या तोंडाला टिशूने झाकून घ्या. नंतर वापरलेल्या टिशूला कचऱ्याकुंडीत फेकून द्या. 
 
* आपले हात स्वच्छ करत राहा. या साठी आपण सेनेटाईझर चा वापर करा.लक्षात ठेवा की सेनेटाईझर आपल्यासह बाळगायचे आहे. 
 
* सामाजिक अंतर पाळा. लोकांपासून लांब राहा. लक्षात ठेवा की कोरोना अद्याप गेलेला नाही.  
 
* वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळावे. बऱ्याच लोकांना आपल्या चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. ही सवय बदला.