लिव्हर(यकृत)साठी घरगुती उपाय गुणकारी
स्मोकिंग, अल्कोहोल, तणाव व जंकफूड या गोष्टीमुळे लिव्हरवर ताण पडतो. यामुळे अनेकांना लिव्हरच्या संदर्भातील आजार उद्भवतात. त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल.
१. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.
२. जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते.
३. जुने लोक आपल्या तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावत, कारण गुळवेल ही तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात.
४. जवसाच्या बियांमध्ये साइटोर्कोन्स-टीट्यूएंट्स आढळून येते. त्यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखले जाते. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो.
५. बीट, कोबी, गाजर, ब्रोकली, कांदा, लसूण, आदी भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर असतात.