काटा रुतला? मग काटा काढण्यासाठी हे उपाय करावे

Last Modified गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (10:49 IST)
काटा असतो तर अगदीच लहान, पण तो रुतल्यावर खूप वेदना होतात. ज्या जागी काटा रुततो त्या ठिकाणी काटा निघेपर्यंत टोचत राहतं. बागकाम करताना किंवा इतर काम करताना हातात किंवा पायात काटा रुततो. म्हणून बागकाम करताना किंवा अनवाणी चालत असताना काळजी घ्यावी. बऱ्याच वेळ काटा न निघाल्याने संसर्ग होऊ शकतो. रुतलेला काटा काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता

* काटा रुतल्यावर त्या जागेला न चोळता चांगल्या प्रकारे साबणाने स्वच्छ करावं. कपड्याने पुसल्यावर काटा दिसत असल्यास हळुवार काटा ट्विंजरने काढावा. बरेच लोक काटा काढण्यासाठी सुई किंवा पिनचा वापर करतात असे करू नये, असे केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणून सुई किंवा पिन आधी अँटिसेप्टिकने स्वच्छ करावं. ट्विंजरला प्रथम स्वच्छ करावं.

* जर आपल्या हातात काटा रुतला असेल आणि तो दिसत नसल्यास बेकिंग सोड्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या या पेस्टला काटा लागल्याच्या जागी लावून पट्टी बांधून घ्या. या पट्टीला एक दिवसासाठी असेच बांधून ठेवावं. पट्टी उघडल्यावर आपल्याला काटा दिसू लागेल. जो आपण सहजपणे बाहेर काढू शकता.

* सैंधव मिठाने देखील काटा सहज काढता येऊ शकतो. काटा दिसत नसल्यास सैंधव मिठाला पाण्यात मिसळून त्या पाण्याने जागेला धुऊन घ्या जिथे काटा रुतला आहे. असे केल्याने काटा दिसू लागतो. ट्विंजरने काट्याला बाहेर काढावं. आपल्याला वेदना होत असल्यास सैंधव मिठाची पट्टी लावावी काटा आपोआप बाहेर निघेल.

* काटा काढण्यासाठी केळ्याची साले हळुवार हाताने काटा रुतलेल्या जागी चोळावे. नंतर केळ्याची सालं ठेवून पट्टी बांधावी. असे केल्याने काटा बाहेर निघून येईल. जर का आपणास जास्त त्रास होत असल्यास काटा निघत नसल्यास डॉक्टरला दाखवावे.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी
कधी कधी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चटपटीत खावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही वीकेंड स्पेशल ...

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी हे आसन करा

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी हे आसन करा
शरीर सरळ आणि स्थिर ठेवण्यासाठी मणक्याची विशेष भूमिका असते. वाकणे, चालणे यासह शरीराचा ...

NEET Preparation Tips: NEET परीक्षेच्या तयारीसाठी ...

NEET Preparation Tips:  NEET परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स
यंदा NEET UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. NEET परीक्षेद्वारे 607 वैद्यकीय, 313 ...

हवाई दलात अग्निशमन दलाची भरती सुरू, 5 जुलैपर्यंत नोंदणी

हवाई दलात अग्निशमन दलाची भरती सुरू, 5 जुलैपर्यंत नोंदणी
देशभरात सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर वायुसेनेने शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ...

Parenting Tips: मुलाच्या स्वभावात होणारा बदल या लक्षणांवरून ...

Parenting Tips: मुलाच्या स्वभावात होणारा बदल या लक्षणांवरून जाणून घ्या
प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मुलं हे त्यांचे विश्व आहे, आपल्या मुलांसाठी पालक काहीही ...