1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 8 एप्रिल 2019 (14:46 IST)

गर्मीला मात करण्यासाठी काही उपयोगी घरगुती सल्ला, नक्की करून बघा

मोसम बदलला आहे आणि उष्णता वाढली आहे. बदलत्या मोसमामुळे लु, ताप, खोकला, अंग दुखी, उलटी जुलाब सारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तब्येत बिघडल्यावर डॉक्टरकडे जाण्याशिवाय कुठलेही पर्याय राहत नाही. अशात काही सावधगिरी बाळगल्या आणि काही घरगुती उपाय केल्याने तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता.  
कोथिंबिरीच्या ताज्या पानांचा रस तयार करा, त्यात थोडासा कापूर घाला आणि या मिश्रणाचे दोन दोन थेंब नाकात घाला. असे केल्याने नाकातून रक्त येणे बंद होते.  
टोमॅटोला लुच्या उपचारासाठी उत्तम मानले जाते. टॅमेटोला कापून घ्या. मीठ आणि साखर घालून त्याला उकळून घ्या, जेव्हा हे गार होऊन जाईल तेव्हा लु ग्रस्त व्यक्तीला रोज किमान 2 वेळा द्यायला पाहिजे. तसेच जेवणानंतर जांभुळाचे सेवन देखील करू शकता त्याने उन्हाळ्याशी निगडित बरेच आजारांवर फायदा मिळतो.   
उन्हाळ्यात पिकलेले पपीता उत्तम मानले जाते, याच्या ज्यूस प्यायल्याने शरीरात ताजगी आणि स्फूर्ती कायम राहते आणि गर्मीत हे आपल्या शरीरातील तापमानाला नियंत्रित ठेवतो.  
आवळ्याला उकळून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या. मॅश केल्यानंतर आवळ्यात साखर आणि मध मिसळा आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. या मिश्रणाला दिवसातून किमान 5 ते 6 वेळेस घेतल्याने गरमीमुळे होणारे जुलाब, उलटी आणि तापात लगेचच फायदा होतो.  
पोटाची जळजळ होत असल्यास शहतूतच्या फळांना मिक्सरमधून काढून त्याचा रस तयार करा आणि रोज दिवसातून दोन वेळा प्या. तीन दिवसांमध्ये ताप, लु ची समस्या आणि पोटाची जळजळ कमी होण्यास मदत मिळते.