देव तुझं भलं करेल
काल संध्याकाळी मी कामा निमित्त ठाणे स्टेशनला उतरलो. ईस्टला माझे एक काम होते, ऑटो पकडायला जात असताना समोरच एक सुमारे 60 वय असलेला भिकारी बसला होता.
त्याच्या कडे पाहून मला दया आली. मी माझ्या बॅग मध्ये असलेले चकलीचे पाकीट त्या भिकारी आजोबांना काढून दिले आणि पुढे निघालो. पुढे जात असतानाच त्या भिकारी आजोबांनी मला आवाज दिला आणि मागे बोलवले. मला उशीर होत असूनही मी पुन्हा त्यांच्या जवळ गेलो......
.
.
मी- काय हो आजोबा काय झाले ?
आजोबा- तु खुप पुण्याचं काम केलस बाबा
(आजोबांनी चोर खिशात हात घातला आणि 130 रुपये काढले आणि माझ्या हातात दिले. मी आश्चर्य चकित झालो आणि आजोबांना म्हणालो )
मी- हे काय?????
आजोबा- काही नाही रे!
तु एवढ्या प्रेमाने भाजणीच्या चकल्या दिल्यास आणि मुड झाला....
जा समोरच्या वाईन शॉप मधून १ IB क्वॉटर घेऊन ये.
देव तुझं भलं करेल ....!