गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

नवीन आठवडा आणि तुमचे भविष्य

WD
मेष
घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. संततीची उन्नती होईल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. चंद्राचा बुध, शुक्र, शनिशी त्रिकोणयोग तर मंगळाशी प्रतियोग होत आहे. महत्वाचे निर्णय आपल्या सल्ल्याने घेतले जातील. आपले अंदाज अचूक ठरतील.

वृष
मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. उत्तरार्धात आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नवोदित कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भविष्यकाळाच्यादृष्टीने गुंतवणूक करणे शक्य होईल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. भावंडांशी सुसंवाद साधाल. जाणीवपूर्वक आपल्या विचारसरणीत केलेल्या अनुकूल बदलामुळे फायदा होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. शुभदिनांक ७, ८.

मिथुन
सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपला आत्मविश्‍वास व महत्वाकांक्षा वाढविणार्‍या घटना घडतील. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल.

कर्क
व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. आपले मनोबल वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.

सिंह
मित्रपरिवाराचे सहकार्यामुळे आपल्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल.

कन्या
व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. सरकारी कामात प्रगती करणारा आहे. सरकारी परवाने येतील. व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. दशमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण नोकरीत भरभराट करणारे राहील. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. जबाबदारीची कामे स्वीकारावी लागतील.

तूळ
गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. आपल्या राशीतून बुध, शुक्र, शनिचे तर भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला आपणांस अतिशयपूरक असेच ग्रहमान लाभले आहे.

वृश्चिक
पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. गुंतवणूकीतून लाभ होतील.

धनू
प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते.

मक
आपल्या मतांचा आदर केला जाईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.

कुंभ
कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. पूर्वी झालेली दिशाभूल निस्तरण्यात वेळ जाईल. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. पंचमस्थ चंद्राचे भ्रमण संततीचा उत्कर्ष करणारे राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील.

मी
गृहउद्योगातून हाती पैसा येईल.कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. मित्र परिवाराची भेट होईल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल.