गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2014
Written By
Last Modified: सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (12:14 IST)

मासिक भविष्यफल सप्टेंबर 2014

मेष  
महिन्याच्या सुवातीलाच दुखणी डोके वर काढतील. दूर्लक्ष करू नका. गंभीर आजार होण्याची शक्यता संभावते. वाहन, मशीनरी यांच्यापासून अपघात संभवतो. किमती वस्तूची काळजी घ्या. लहान- लहान चुका मोठे नुकसान करू शकतात. आर्थिक चणचण भासू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल. 
 
वृषभ 
विनाकारण भीती, चिंता राहिल. स्वाभावानुसार चुका होतील. जुनी वाद, मतभेद वाढून डोके दुखी वाढेल. सहयोग, मार्गदर्शन कमी आल्याने अडचणी निर्माण होतील. व्यापारात अचानक फायदा होईल. विरोधक शांत बसतील. कुटुंबातील वाद संयमाने सोडवता येतील. सामाजात प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या चांगल्या कामावर खर्च होईल. 
 
मिथुन  
आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. ध्येर्याने काम घ्यावे लागेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.
 
कर्क 
उत्साह देणारा काळ राहिल. लहान सहान गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.
 
सिंह 
समस्याच्या मालिकांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक प्रकरणात मोठे नुकसान होण्याची शक्यता दर्शविते. आरोग्यविषयी चिंता सतावेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. 
 
कन्या 
प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी‍ होईल. पुढे जाण्‍याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल. 
 
तूळ 
प्रगती मिळवून देणारा काळ आहे. अथक परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामात कोणावर विश्वास ठेवू नका. आळस टाळा. कुटूंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यात, यश, प्रतिष्ठा मिळेल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी, रोजगार बदलता येईल.
 
वृश्चिक 
वेळेच भान ठेवावे लागेल. शांती, सहयोग, समाधानाने कार्य करावे लागेल. व्यापार-व्यवसाय नुकसान संभवते. गणपती बनवायला जात तर तेथे हनुमान बनेल, अर्थात कामे बिगडण्याची शक्यता आहे. जुनी वाद वाढण्याची शक्यता आहे. खरेदी, विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. विरोधक वाढतील. स्वभावावर नियंत्रण राखावे लागले. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावे लागतील. 
 
धनू 
अधिक उताविळपणा करू नका. तुमच्या विषयी असंतोष पसरेल. चिंता वाढेल. विचार कराल काही व होणार दुसरेच. व्यापारातील स्पर्धा टाळा. कर्ज काढू नका. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून सावध रहा. कटु अनुभव येणाचा संभव आहे. नुकसान झाले तर स्वत:चा तोल जाण्‍याची शक्यता नाकारारता येत नाही. 
 
मकर 
प्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे
 
कुंभ  
अनुभव उपयोगी पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात यश मिळेल. आवक चांगली राहिल्याने गुंतवणूक करू शकाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. किमती वस्तू खरेदी करू शकाल.
 
मीन 
पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सम्मान मिळेल.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.