शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

असा ही एक उंदीर

- राहुल

WD
एक असतो उंदीर, त्याला हत्तीचे पाय
घुबडाचे डोळे अन्‌ पोटाची गाय

आवाज त्याचा बेडकासारखा,
फिरतो कसा वार्‍यासारखा
तुम्हा येता दिसला तर बाजूला सरका

शिंग त्याची गेंड्याची
अन्‌ शिकार करतो वाघाची
पोटभर खाऊन एकदम ताणून द्यायची

जेव्हा तो फिरायला जातो,
सिंहसुद्घा लपून बसतो
झोपेत जेव्हा घोरतो
ेव्हा डरकाळ्या फोडतो.